जळगाव जिल्हा

एमडी मेडीसीन परीक्षेत डॉ. मयूर तायडे उत्तीर्ण

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२१ । जळगाव शहरातील रहिवाशी डॉ. मयूर सुरेश तायडे हे नुकतेच एम.डी.(मेडीसिन) परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. मध्यप्रदेशातील भोपाळ येथील गांधी मेडिकल कॉलेज येथुन त्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण केली.

Untitled design 88 jpg webp

डॉ. तायडे यांनी एमबीबीएस मुंबई येथील ग्रँड मेडिकल कॉलेज (जे.जे.हास्पीटल) येथे केले असून येथेही ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. तसेच त्यांनी आतापर्यंत अनेक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. त्यांना अभ्यासासोबतच वाचन, स्पर्धा परीक्षा आणि संगीताची आवड आहे. डॉ. मयूर तायडे हे मु.जे. महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य आणि हिंदी विभाग प्रमुख डॉ. सुरेश तायडे यांचे चिरंजीव आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button