धम्मचक्र प्रवर्तन दिननिमित्त भुसावळसह मुंबई, नाशिक, पुण्यावरून धावणार अनेक गाड्या; वेळापत्रक पाहा..

सप्टेंबर 29, 2025 4:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२५ । जळगाव जिल्ह्यातील अनुयायांसाठी आनंदाची बातमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मचक्र प्रवर्तन दिन निमित्त दरवर्षी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. यंदाही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नव्या अनारक्षित विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. ज्यामध्ये नाशिक रोड – नागपूर मेमू गाडीचाही समावेश आहे. या गाडीला जिल्ह्यात चाळीसगाव, पाचोरा, जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबा मंजूर आहे.

train

मध्ये रेल्वेनं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पुणे – नागपूर, नाशिक – नागपूर, मुंबई – नागपूर, नागपूर – अकोला, नागपूर – भुसावळ आणि सोलापूर–नागपूर या विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामधील काही गाड्या जळगाव आणि भुसावळ मार्गे धावणार आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील अनुयायांची सोय झाली आहे.

०१२१३ भुसावळ ते नागपूर विशेष गाडी दोन, तीन आणि चार ऑक्टोबरला भुसावळ येथून दुपारी ०५.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १२.२० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ०१२१४ विशेष गाडी दिनांक एक, दोन आणि तीन ऑक्टोबरला नागपूर येथून ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.०० वाजता भुसावळ येथे पोहचेल.

०१२१५ पुणे – नागपूर विशेष गाडी एक ऑक्टोबरला पुणे येथून दुपारी ०२.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०७.३० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ०१२१६ विशेष गाडी दिनांक दोन ऑक्टोबरला रोजी नागपूर येथून रात्री ११.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.२० वाजता पुणे येथे पोहोचेल.

०१०१९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – नागपूर विशेष गाडी एक ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दुपारी ०२.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.१० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ०१०१२० विशेष गाडी दोन ऑक्टोबरला नागपूर येथून रात्री १०.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ०५.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.

०१२१७ नाशिक रोड – नागपूर मेमू विशेष गाडी एक, दोन आणि तीन ऑक्टोबरला नाशिक रोड येथून सायंकाळी ०६.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.०० वाजता नागपूर येथे पोहोचेल. ०१२२४ विशेष गाडी दोन ऑक्टोबरला नागपूर येथून दुपारी ०४.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०४.१५ वाजता नाशिक रोड येथे पोहोचेल. ०१२२६ विशेष गाडी दिनांक तीन आणि चार ऑक्टोबरला नागपूर येथून दुपारी १२.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.१५ वाजता नाशिकरोड येथे पोहोचेल.

०१०२९ सोलापूर – नागपूर विशेष गाडी एक ऑक्टोबरला सोलापूर येथून ०९.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५.१० वाजता नागपूर येथे पोहचेल. ०१०३० विशेष गाडी दिनांक दोन ऑक्टोबरला नागपूर येथून रात्री ११.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता सोलापूर येथे पोहचेल. या सर्व गाड्या चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ स्थानकांवर थांबणार आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now