जळगावातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; मोठी दुर्घटना टळली

सप्टेंबर 6, 2024 12:15 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२४ । जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत आहे. गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस अपघात होऊन निष्पाप लोकांचा जीव गेल्याची घटना ताजी असतानाच धुळ्याकडून भुसावळकडे भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॉलाचे गुजराल पेट्रोल पंपाच्या पुढे टायर फुटले. गोंधळलेल्या चालकाने नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नात ट्रॉला दुभाजकावर आदळली.

AJc

सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. गुजराल पेट्रोल पंपाच्या उड्डाणपुलावरून हा ट्रॉला जात असताना मानराज पार्कच्या अलीकडे टायर फुटले. त्यामुळे चालकाचा प्रचंड गोंधळ उडाला. रस्त्यावरच्या वाहनावर ट्रॉला धडकू नये म्हणून चालकाने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दुभाजकाच्या दिशेने नेला. त्यात लोखंडी व सिमेंटचे ब्लॉक पंधरा फुटापर्यंत घासले गेले.

पाइप तर अक्षरशः उंच उडाले. हा अपघात पाहणाऱ्यांचा अक्षरशः थरकाप उडाला. चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठी हानी टळली. ट्रॉला पलटी होण्यासह समोरची वाहने उडविण्याचा धोका होता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now