शनिवार, डिसेंबर 9, 2023

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, आज जळगाव जिल्ह्यात कशी आहे पावसाची स्थिती?

जळगाव लाईव्ह न्यूज : 29 जून 2023 : राज्यात अनेक ठिकाणी मागील काही दिवसापासून पावसाने चांगली हजेरी लावली असून मात्र अद्यापही जळगाव जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस झालेला नाहीय. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी जोरदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. दरम्यान हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे. यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. तर जळगावला आज येलो अलर्ट जारी केला आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
आज गुरूवारी राज्यातील रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे, त्यामुळे या भागात आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. दुसरीकडे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.

जून महिना संपत आला तरी देखील जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली नाहीय. यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या रखडल्या आहेत. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. रात्री देखील पावसाने तूरळक पावसाची हजेरी लावली. मात्र पेरणी योग्य पाऊस होत नाहीय. शेतकरी मुसळधार पावसाची प्रतीक्षा करत आहे. दरम्यान, हवामान खात्याकडून आज जळगाव ला पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे.