जळगाव लाईव्ह न्यूज । २६ डिसेंबर २०२१ । चाळीसगाव शहरातील गजानन वाडी भागात वीज बिल भरले नाही म्हणून विजेचे कनेक्शन कट करण्यासाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करत एकाने शासकीय कामात अडथळा आणला. ही घटना शुक्रवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास घडली.
मारहाण करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. योगेश रमेश चौधरी याने कर्मचारी शिरीष मराठे यांना ढकलून देत त्यांच्या कानाजवळ चापटांनी मारले. तसेच शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.

हे देखील वाचा :
- जळगावात जिओ टॉवरच्या जनरेटरमधून डिझेल चोरी करणारा जेरबंद
- Jamner : टायर फुटला अन् पोषण आहाराचा टेम्पो पलटी; दोन हमालांचा जागीच मृत्यू
- मेहुणबारे पोलिसांकडून गुटखा तस्करीचा पर्दाफाश; ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
- कासोदा शिवारातील २३ शेळ्या-बोकड चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून दोघे गजाआड
- जळगावात प्रेमसंबंधाच्या वादातून विवाहित महिलेचे अपहरण करून खून; आरोपी जेरबंद






