जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑक्टोबर २०२५ । प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक बदल होत असतात. त्याच नुसार येत्या १ नोव्हेंबर २०२५ पासून नवीन बँकिंग नियम लागू होत आहेत, ज्या अंतर्गत खातेधारक त्यांच्या बँक खात्यांना एक दोन नव्हे तर चार नॉमिनी जोडता देणार आहे. अर्थमंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार, बँक खातेधारक आता त्यांच्या बँक खात्यात चार नामांकित व्यक्ती जोडू शकतील. या नवीन नियमामुळे दाव्याच्या निपटारामध्ये पारदर्शकता येईल आणि दाव्याच्या निपटारा प्रक्रियेला सोपीता येईल.

हे नियम पुढच्या महिन्यापासून म्हणजेच १ नोव्हेंबरपासून लागू होतील. यामध्ये तुम्ही आता बँक अकाउंट, लॉकर किंवा इतर वस्तू ज्या लॉकरमध्ये ठेवल्यात त्यांच्यासाठी चार नॉमिनी लावू शकतात. तुम्हाला याआधी फक्त एक किंवा दोन नॉमिनी लावण्याची परवानगी होती. त्यानंतर आता हा नियम बदलला आहे.
नवीन नियम काय आहे?
नवीन नियमानुसार तुम्ही चार नॉमिनी निवडू शकतात. जर तुम्ही पहिला नॉमिनी निवडला तो व्यक्ती जर हयात नसेल तर दुसरा व्यक्ती आपोआप नॉमिनी होईल. तेच ग्राहक स्वतः हे पैसे चार नॉमिनीमध्ये किती वाटायचे हे ठरवू शकतात. याचा निर्णय स्वतः ग्राहक किंवा खातेधारक घेईल.
लॉकरचे नियम
सेफ कस्टडी आणि लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंसाठी क्रमाने नॉमिनीची अनुमती असेल.म्हणजे पहिल्या नॉमिनीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याला अधिकार मिळेल. यामुळे बँकिंग व्यवस्थेत पारदर्शकता राहिल. ग्राहकांना त्यांच्या मर्जीने वारसदार ठरवता येईल.












