⁠ 
शनिवार, मे 4, 2024

प्रतीक्षा संपली ! बजाजच्या दोन नवीन पल्सर बाइक लॉन्च, किंमत आणि वैशिष्ट्य जाणून घ्या

जळगाव लाईव्ह न्यूज । 8 फेब्रुवारी 2024 । बजाज ऑटोची पल्सर सीरिजची बाईक भारतातच नव्हे तर जगातही खूप लोकप्रिय आहेत. भारतीय बाजारपेठेत या बाईकला चांगली मागणी असून पल्सर वेगवेगळ्या रेंजमध्ये उपलब्ध आहेत. यात 125 सीसी पासून 250 सीसी इंजन कॅपेसिटीवाल्या बाइक्स आहेत. आता याच दरम्यान, बजाजच्या दोन नवीन पल्सर बाइक लॉन्च झाल्या आहेत. भारतीय बाजारपेठेत त्यांची टक्कर TVS Apache RTR 160, Aprilia SR 125 आणि Honda XBlade सारख्या मोटर सायकलसोबत आहे. जाणून घ्या दोन्ही बाइक्सची किंमत आणि वैशिष्ट्य.

फीचर्स
बजाज पल्सर एन150 च्या टॉप मॉडलमध्ये नवीन LCD डिस्प्ले, ब्लूटूथ कनेक्टिविटी आहे. याच्या हँडलिंगसाठी कस्टमर Bajaj Ride कनेक्ट ऐप डाऊनलोड करु शकतात. ज्याच्या मदतीने डॅशबोर्डवर कॉल एक्सेप्ट/ रिजेक्ट करु शकता. त्याशिवाय तुम्हाला नोटिफिकेशन अलर्ट सुद्धा मिळेल. इतकच नाही, डॅशबोर्डवर रियल टाइम फ्यूल एफिशिएंसी, एवरेज मायलेज आणि डिस्टेंस डिटेलही पाहू शकता. या मोटरसायकलला मागच्या बाजूला डिस्क ब्रेक आणि सिंगल चॅनल ABS सिस्टम देण्यात आलय. 2024 Bajaj Pulsar N160 मध्ये मिळते-जुळते इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि फीचर्स दिले जातील.

इंजिन
नव्या Pulsar N150 बाइकमध्ये 149.6 सीसी सिंगल सिलेंडर इंजिन देण्यात आलय. जे 14bhp पावर आणि 13.5Nm पीक टॉर्क जनरेट करतं. तेच, Pulsar N160 मध्ये 165 सीसी, सिंगल सिलेंडर इंजिन मिळतय, जे 16bhp पावर आणि 14.65Nm टॉर्क आऊटपुट देतं. दोन्ही बाइक फ्रंट टेलिस्कोपिक फोर्क्स आणि रियर मोनोशॉक यूनिट्ससोबत येतात.

किंमत
2024 Bajaj Pulsar N150 दोन वेरिएंट उपलब्ध आहेत. याची किंमत 1.18 लाख रुपयापासून 1.24 लाख रुपयापर्यंत आहे. तेच पल्सर N160 च बेस मॉडलची किंमत 1.31 लाख रुपये आणि टॉप मॉडलची किंमत 1.33 लाख रुपये आहे. ही एक्स-शोरूम प्राइस आहे.