⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

बहादरपूरला सट्टा घेणाऱ्याला पकडले, साहित्य जप्त‎

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । पारोळा‎ तालुक्यातील बहादरपूर येथे‎ बसस्थानकामागील टपरीच्या‎ आडोशाला रोहिदास बापू पाटील‎ (रा.शिरसोदे, ता.पारोळा) हा २१‎ रोजी सकाळी सट्टा खेळताना‎ आढळला होता. त्याच्याकडून १७१०‎ रुपये रोख व मटका सट्ट्याचे‎ आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या व एक‎ कार्बनचा तुकडा असे साहित्य‎ आढळले होते.

पारोळा पोलिसात‎ पोलिस काँन्स्टेबल शशिकांत निकम‎ यांनी खबर दिल्यावरून पारोळा‎ पोलीस स्टेशनला मुंबई जुगार कलम‎ १२ (अ) प्रमाणे नोंद करण्यात‎ आली आहे. संशयिताला पोलिसांनी‎ अटक केली आहे.

सहायक पोलिस‎ निरीक्षक रवींद्र बागुल, उपनिरीक्षक‎ योगेश जाधव, नाना पवार,‎ किशोर पाटील, सुनील साळुंके यांनी‎ ही कारवाई केली. परिसरात‎ पोलिसांनी सातत्यपूर्ण कारवाई‎ करून, अवैध व्यावसायिकांवर‎ आळा घालावा, अशी अपेक्षा व्यक्त‎ केली जात आहे.‎

हे देखील वाचा :