बी.यू.एन. रायसोनीअन्सने नाटीकेद्वार दाखविला येशु ख्रिस्तांचा जन्म

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ डिसेंबर २०२२ । बी.यू.एन. रायसोनी स्कूल, सी.बी.एस.सी. पॅटर्न, प्रेमनगर, येथे दि. 24 डिसेंबर रोजी नाताळ हा सण साजरा करण्यात आला. या प्रसंगी शाळेतील इ. ४थी ,५वी, व ६वी च्या विद्यार्थ्यांनी येशु ख्रिस्त यांच्या जिवनावर आधारीत नाटीका सादर केली. तसेच इ. २री, ५वी, व ६वी च्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले.

इ. ६ वी मधील विद्यार्थी जयेश राजू कंखरे यांने सांताक्लॉजची वेशभूषा परिधान करुन चिमुकल्या विद्यार्थ्यांना चॉकलेट व गिफ्ट वाटप केले. शाळेतील सगळ्या चिमूकल्यांनी सांताक्लॉजला पाहून आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात ही कार्यक्रमाला आलेले पाहुणे पालक शिक्षक संघाचे सदस्य भाग्यश्री लोहार व मोनिका कोठारी यांनी येशु ख्रिस्तांच्या प्रतिमेपुढे मेणबत्ती लावून तसेच भाऊसाहेबांच्या व देवी सरस्वीतीच्या प्रतिमेला हार घालुन केली. सुत्रसंचालन अश्वीनी कापसे यांनी केले. तसेच २४ डिसेबर रोजी साने गुरुजी यांच्या जयंती निमीत्त त्यांच्या प्रतीमेला हार घालुन त्यांना अभिवादन करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे यांनी मुलांना येशु ख्रिस्तांच्या जीवनावर आधारीत गोष्ट सांगितली. नाताळ सण जल्लोषात साजरा होतांना बघुन शाळेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, व उपाध्यक्ष उमेद रायसोनी यांनी मुलांचे कौतुक केले .