कलम ३७० कोणीही पुन्हा आणू शकत नाही – गुलाम नबी आझाद

सप्टेंबर 12, 2022 7:32 PM

gulam nabi azad jpg webp

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० बाबत गुलाम नबी आझाद यांनी मोठे वक्तव्य केले आहे. यावेळी ते म्हणाले कि, मी, काँग्रेस, शरद पवार किंवा ममता बॅनर्जी यांच्यासह कुणीही ३७० कलम पुन्हा आणू शकत नाही. याच बरोबर येत्या दहा दिवसांत नव्या पक्षाची घोषणा करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळावा यासाठी संघर्ष करणे यासाठी पक्ष काम करेल असे आजाद म्हणाले. माझ्या नावाप्रमाणेच नव्या पक्षाची विचारसरणी ही आझाद असेल.असेही ते म्हणाले. पक्षाचे नाव आझाद ठेवण्यात यावे, असे माझ्या कित्येक सहकाऱ्यांनी सांगितले. मात्र ते नाव मी ठेवणार नाही असे आजाद म्हणाले.

नव्या पक्षाच्या माध्यमातून जम्मू-काश्मीर राज्याचा दर्जा पुनर्स्थापित करण्यासाठी आणि तेथील लोकांच्या नोकरी आणि जमिनीच्या हक्कांच्या संरक्षणासाठी संघर्ष करण्यावर भर दिला जाईल. असे आजाद म्हणाले

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now