जळगाव लाईव्ह न्यूज । खाजगी टेलिकॉम कंपनी एअरटेलचे (Aritel) ने पुन्हा एकदा युजर्सना मोठा धक्का दिला आहे. यावेळी कंपनीने स्वस्त प्लान शोधणाऱ्या युजर्सना निराश केले आहे. एअरटेलने त्यांचा स्वस्त रिचार्ज १९५ रुपयांच्या प्लानमध्ये बदल केला आहे. या बदलानंतर युजर्सना आता पूर्वीसारखी सुविधा मिळणार नाही. एअरटेलने या प्लानमध्ये कोणते बदल केले आहेत ते सविस्तर जाणून घेऊया…

एअरटेलच्या १९५ रुपयांच्या प्लानबद्दल बोलायचे झाले तर, हा एक डेटा व्हाउचर प्लान आहे. या प्लानअंतर्गत युजर्सना पूर्वी ३० दिवसांसाठी १५ जीबी हाय स्पीड डेटा मिळत होता. पण आता कंपनीने या प्लानमध्ये बदल केले आहेत आणि डेटा कमी केला आहे.

आता या प्लानच्या रिचार्जमध्ये युजर्सना फक्त १२ जीबी डेटा दिला जाईल. यासोबतच, या प्लॅनमध्ये आधी ९० दिवसांसाठी Jio Hotstar OTT चा फायदा मिळत होता, पण आता OTT चा फायदा देखील फक्त ३० दिवसांसाठी उपलब्ध असेल.
एअरटेलच्या १९५ रुपयांच्या प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, हा एक डेटा व्हाउचर प्लॅन आहे. या प्लॅन अंतर्गत वापरकर्त्यांना ३० दिवसांसाठी १५ जीबी हाय स्पीड डेटा मिळत होता. पण आता कंपनीने हा प्लॅन बदलला आहे आणि डेटा कमी केला आहे. आता या प्लॅनच्या रिचार्जमध्ये वापरकर्त्यांना फक्त १२ जीबी डेटा दिला जाईल. यासोबतच, या प्लॅनमध्ये आधी ९० दिवसांसाठी Jio Hotstar OTT चा फायदा मिळत होता, पण आता OTT चा फायदा देखील फक्त ३० दिवसांसाठी उपलब्ध असेल.












