⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

प्रलंबित मागण्यांना तात्काळ मंजुरी द्या : नागरिकांची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील विविध प्रलंबित असलेल्या योजनांना तात्काळ मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगरच्या तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली. दरम्यान, तहसीलदारांनी मागील बैठकीत मंजुर प्रकरणांची यादी तत्काळ प्रसिद्ध केली तसेच लवकरच समिती बैठकीचे आयोजन करून प्रलंबित प्रकरणांना मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन दिले.

मुक्ताईनगर तालुक्यातील विविध योजनांचे प्रकरण मंजुरी अभावी प्रलंबित होते. तसेच त्यापूर्वी समितीच्या झालेल्या बैठकीत मंजुरी मिळालेल्या लाभार्थींची यादी प्रकाशित न केल्यामुळे पात्र लाभार्थी यांना अनुदान पासून वंचित राहावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी ताई खडसे खेवलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुक्ताईनगरच्या तहसीलदार श्वेता संचेती यांची भेट घेऊन ही मागणी केली. समाजातील अंध, अपंग, विधवा, परितक्ता, निराधार व्यक्तींना चरितार्थ चालवण्यासाठी आधार म्हणून शासनातर्फे संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ राज्य सेवा योजनेद्वारे आर्थिक मदत दिली जाते.

या योजनांच्या लाभासाठी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून आपल्या प्रकरणांना मंजुरी मिळून योजनेचा लाभ मिळेल. या आशेवर मुक्ताईनगर तहसील कार्यालयात संबंधित विभागाकडे प्रकरण दाखल केलेले आहे. परंतु प्रकरणांना मंजुरी देणाऱ्या समित्याची गेल्या तीन चार महिन्यांपासून बैठकी झाल्या नाही. त्यामुळे हजारो प्रकरण मंजुरी अभावी तहसील कार्यालयात पडून आहेत. या प्रकरणांना मंजुरी मिळत नसल्या कारणाने समाजातील पात्र लाभार्थी योजनांपासून वंचित राहत आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजु माळी, माजी प.स. सभापती विलास धायडे, नगरसेवक मस्तान कुरेशी, बापु ससाणे, प्रविण पाटील, बाळा भालशंकर, योगेश काळे,मधुकर गोसावी, संजय कोळी, प्रदिप साळुंखे, बबलू सापधरे, शकील खान, चेतन राजपूत, बुलेस्ट्रिन भोसले, शफी भोसले, विठ्ठल जोगी आदी उपस्थित होते.