प्रा.भूषण चौधरी यांची प्रभारी संचालक पदी नियुक्ती

एप्रिल 4, 2022 11:47 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाच्या प्रभारी संचालकपदी जैवशास्त्र प्रशाळेतील प्रा.भूषण चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

nmu 1

कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी ही नियुक्ती केली आहे. विद्यापीठ कायद्याच्या कलम २० (१) नुसार नवोपक्रमाची संकल्पना प्रसुत करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास हे मंडळ कार्यरत असणार आहे. उद्योजकता वाढीला लागावी म्हणून या मंडळाकडून काम केले जाईल. प्रा. भूषण चौधरी हे जैवशास्त्र प्रशाळेत कार्यरत असून इनक्युबेशन सेंटरचेही ते समन्वयक संचालक आहेत. तसेच विद्यापीठाच्या ट्रेनिंग प्लेसमेंट सेलचे ते समन्वयक म्हणूनही काम पाहत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now