मतदार याद्यामधील हरकती दाखल करण्याचे अवाहन

नोव्हेंबर 4, 2021 10:04 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ नोव्हेंबर २०२१ । एरंडोल मतदार संघात असणाऱ्या एरंडोल तालुक्यात 137, पारोळा तालुक्यातील 123 व भडगांव तालुक्याती 30 अशा एकुण 290 मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचे मार्फत प्रारूप मतदार याद्या 01 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आल्या. दि . 01 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्या जाणार आहेत.

Voter List jpg webp

तसेच नवीन मतदार नोंदणीबाबत विशेष मोहिमेचा कालावधी दि.13 व 14 आणि 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी असणार आहे . तद्नंतर दावे व हरकती निकाली काढण्याचा कालावधी हा दि. 20 डिसेंबर 2021 पर्यंत ठेवण्यात आला असुन दि. 05 जानेवारी 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. तरी, सदर कार्यक्रमाची माहिती ग्रामीण भागात ग्रामसेभेचे आयोजन करून त्यात मतदार याद्यांचे वाचन करुन एकाच व्यक्तीचे दोनदा आलेले नांव मृत व्यक्तीं, गांव सोडून गेलेली व्यक्ती किंवा अन्य मतदारयादीत नांव असलेली सर्व नावे यावेळी ग्रामसेवक यांनी पुरावे घेऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मदतीने कमी करावयाची आहेत.

त्यामुळे या बाबत तमाम जनतेने दखल घेऊन सहकार्य करण्याचे अवाहन 16 एरंडोल संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल विनय गोसावी व सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार एरंडोल सुचिता चव्हाण यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now