⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

उदासीन प्रशासन : ५ वर्षांत फक्त ५५० नागरिकांनाच घरकुल योजनेचा लाभ

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२२ । शहरातील १८ हजार नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी शासनाकडून प्रत्येकी २ लाख ५० हजारांचे अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या घरकुल विभागामार्फत अर्ज मागविण्यात आले. परंतु मनपा प्रशासनाच्या कासवगतीच्या कारभारामुळे ५ वर्षांत फक्त ५५० नागरिकांनाच घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे. यामुळे नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

सर्वांना घरे उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने शासनाकडून प्रधानमंत्री आवास योजना सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत २०१७ ते २०२२ दरम्यान, शहरातील १८ हजार नागरिकांना स्वःतच्या जागेवर घरे बांधण्यासाठी २ लाख ५० हजार रुपयांचे शासनाकडून अनुदान देण्यात येणार होते. त्यासाठी महापालिकेच्या घरकुल विभागाकडून नागरिकांचे अर्ज मागविण्यात आले होते. मनपाच्या घरकुल विभागाने यासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करुन जास्तीत जास्त अर्ज मागविणे गरजेचे होते. परंतु मनपाच्या ढिम्म कारभारामुळे पंतप्रधान आवास योजनेचा लाभ लोकांना मिळालेला नाही. एकूण अर्जंपैकी नसल्याचे समोर आलेल्या अर्जांपैकी १ हजार ५८६ अर्ज वैध ठरविले होते. यापैकी फक्त २०० नागरिकांना घराचे पुर्ण अनुदान मिळालेले असून ३५० नागरिकांचे बांधकाम सुरु आहे.

७५६ कर्ज घेऊन बांधली घरे नागरिकांकडून ५ लाख

महापालिकेच्या घरकुल विभागामध्ये रुपये घेवून शासनाचे २ शहरातील अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाख ५० हजारांचे अनुदान नागरिकांनी घर बांधण्यासाठी अर्ज केले. बांधकाम व्यावसायिकाला त्यापैकी १५८६ नागरिकांची प्रकरणे मंजुर मिळणार होते. परंतु वारंवार मनपाच्या पायऱ्या झिजवूनदेखील प्रतिसाद मिळत नसल्यामुळे ७५६ लोकांनी स्वतःच कर्ज घेऊन आपली घरे बांधून घेतली आहेत.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जळगाव महापालिकेकडून खासगी भागीदारी तत्वावर परवडणाऱ्या घरांची निर्मिती यात येणार होती. यामध्ये खासगी बांधकाम व्यावसायिक अल्पदरात ३२२ चौरस फुटात घर बांधून देणार होता. त्या घराची किंमत ७ लाख ५० हजार असेल