एरंडोल तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती अशासकीय सदस्य पदी आनंदा चौधरी

जून 9, 2021 10:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जून २०२१ । एरंडोल तालुक्यासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना गठीत करण्यात आली आहे या समितीच्या सदस्य पदी एरंडोल येथील शिवसेनेचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते आनंदा चौधरी भगत यांची सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशा आशयाचे पत्र नुकतेच त्यांना आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.

ananda chaudhari

या नियुक्ती बाबत त्यांचे पारोळा बाजार समितीचे सभापती अमोल पाटील,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष रमेश महाजन, तालुका प्रमुख वासुदेव पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख जगदीश पाटील, माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर, राजेंद्र चौधरी, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,नगरसेवक कृणाल महाजन, अतुल महाजन, पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल महाजन, परेश बिर्ला, चिंतामण पाटील, संभाजी पाटील, विवेक पाटील, रेवानंद ठाकुर, शरद ठाकुर आदींनी अभिनंदन केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now