रेल्वेतून पडल्याने अनोळखी तरुणाचा मृत्यू

एप्रिल 22, 2022 9:08 PM

 जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । पाचोरा रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेतून ३८ वर्षीय अनोळखी तरुण पडल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असुन  तरुणाची ओळख पटवण्यासाठी आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.   

crime jpg webp

 पाचोरा येथे धावत्या रेल्वेतून २१ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास अनोळखी इसमाच्या डोक्यात जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे सदरची घटना रेल्वे खंबा ३७२ /१९ नजीक घडली आहे मयत तरुणाचे वय अंदाजे ३८ वर्षे असून उंची ५ फूट ६ इंच गौरवर्ण नाक सरळ डोक्याचे केस बारीक चेहरा लांबट शरीरबांधा मध्यम अंगावरील रंगाचा शर्ट त्यावर सफेद शर्ट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट परिधान केलेला आहे माहितीस्तव व कोणास काही माहिती असल्यास त्यांनी भ्रमणध्वनी क्रमांक ९०२८१५२९६७ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहनरेल्वे पोलिसांनी केले आहे या घटनेचा पुढील तपास चाळीसगाव प्रभारी अधिकारी शब्बीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक ईश्वर बोरुडे हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now