⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

रिंगणगावच्या तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ नोव्हेंबर २०२२ । एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे ३१ वर्षीय तरुणाने घराच्या छताच्या कडीला दोराचा गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज उघडकीस आली. या प्रकरणी एरंडोल पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

प्रमोद लक्ष्मण डोखे ( वय ३१ वर्षे ) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रमोद डोखे हा आज मंगळवारी दोरीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. त्यानंतर गावातील लोकांच्या मदतीने त्याचे प्रेत खाली उतरवून पिकअप गाडीने एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. कैलास पाटील यांनी तपासणी केली असता प्रमोद मृत झाल्याचे घोषित करण्यात आले.

दरम्यान, मयत तरुणाचे भाऊ अमोल मुरलीधर डोखे यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिली. त्यानुसार पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.