अरेरे! महिला पोलीस कर्मचार्‍याने बनावले बनावट कागदपत्र, गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२२ । न्यायालयाच्या समन्स बजावणी अहवालावर कासोदा पोलिस ठाण्यातील महिला कर्मचारी सविता रोहिदास पाटील यांनी स्वाक्षरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशान्वये एरंडोल पोलिसात सविता पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सविता रोहिदास पाटील या महिला पोलिस कर्मचारी कासोदा पोलिस स्टेशनला कार्यरत असून त्यांनी 9 नोव्हेंबर 2022 रोजी सायंकाळी समन्स बजावणी अहवालावर कासोदा पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले साक्षीदार म्हणून पोलिस शिपाई जितेश संजय पाटील, महादू संतोष पाटील तसेच पंच नितीन वसंतराव पवार (कासोदा) या तिघांच्या बनावट स्वाक्षर्‍या केल्याची बाब उघडकीस आल्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर एरंडोल न्यायालयाचे सहा.अधीक्षक अनिल नारायण पाटील (56) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक गणेश अहिरे करीत आहेत.