---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

आमच्या मंत्रिमंडळात सर्वात फिट गिरीश महाजन ; अजितदादांनी केलं कौतुक..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑगस्ट २०२३ । पुण्याचे दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण (Vinayak Nimhan) यांच्या जयंती निमित्त पुण्यातील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मोफत महाआऱोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संबंधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) राज्याचे मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या फिटनेसचं प्रचंड कौतुक केलं.

ajit pawar girish mahajan jpg webp webp

काय म्हणाले अजितदादा?
अजित पवार म्हणाले कि, आमच्या मंत्रिमंडळात सर्वात फिट मंत्री गिरीश महाजन आहेत. साठीच्या पुढे गेले पण कुणीच म्हणणार नाही की ते साठीच्या पुढे गेले. इरशाळवाडी सारख्या ठिकाणी गिरीश महाजन ट्रेकिंग करत गेले. इरशाळवाडीत ते सर्वात आधी पोहोचले. त्या टेकडीवर ते एकटे चढून गेले. महाजनांनी त्यांचं आरोग्य फिट ठेवलं आहे. महाजनांचा दंड मी नेहमीच दाबून बघतो. ते खूप फिट आहेत, असं कौतुक करतानाच तुम्हीही फिटनेस ठेवा. आरोग्य सांभाळा असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

---Advertisement---

देशाच्या आणि राज्यातल्या जनतेचे आरोग्य चांगले राहावे हीच अपेक्षा आहे. सर्व सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा विचार होत आहे याबद्दल आभारी आहे. अलिकडे उपचाराचे खर्च वाढले आहेत, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---