उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना कार्ड वाटप

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आज जळगांव राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या अभिषेक पाटील फाऊंडेशनच्या अनमोल सहकार्याने आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांना नोंदणी करुन कार्ड वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष जितेंद्र चांगरे यांनी पद्मावती मंगल कार्यालय,सिंधी कॉलनी तसेच राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जळगांव सरचिटणीस पंकज बोरोले यांनी अयोध्या नगर येथे सदर कार्यक्रम आयोजिला होता.

यावेळी या कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी जळगांवचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जितेंद्रभाई चांगरे, राष्ट्रवादीच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय प्रमुख सौ.कल्पनाताई पाटील, युवक अध्यक्ष स्वप्निल नेमाडे, सरचिटणीस पंकज बोरोले, विनोद पाटील, तुषार पाटील,कौसर काकर,ममता तडवी, मगर ताई, कमल पाटील,अर्चना कदम, शकुंतला धर्माधिकारी, शंभू रोकडे , पवन माळी ,चिंतामणी सोनवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला तसेच आयोजकांचेही आभार मानन्यात आले. सदर उपक्रम जळगांव शहरातील प्रत्येक प्रभागात राबविण्यात येणार असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले.