---Advertisement---
राजकारण महाराष्ट्र

अजित पवारांनी केला राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर ; कोण आहे?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२४ । लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील भाजपने आपले उमेदवार जाहीर केले आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीने अद्यापही उमेदवार जाहीर केले नसून यामुळे महायुतीच्या जागावाटपावर तिढा कधी सुटेल? याकडे लक्ष लागून आहे. परंतु अशातच अजित पवारांनी आज पत्रकार परिषदेत आपल्या पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे.

ajit pawar 2 jpg webp webp

लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून रायगडच्या जागेवर सुनील तटकरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतवण्यात आलं आहे. मात्र बारामती मतदारसंघाचा सस्पेन्स कायम ठेवला आहे. महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही, त्याआधीच अजित पवार यांनी रायगडच्या जागेची घोषणा करत ९९ टक्के काम पूर्ण झालंचं भाष्य त्यांनी केलं आहे.

---Advertisement---

अजित पवार गटाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सुनील तटकरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. दरम्यान, आढळराव पाटील आज सायंकाळी अजित पवार गटात प्रवेश करणार. २० वर्षांनंतर पाटील यांचा शिरूरमध्ये पक्षप्रवेश होत आहे. शिरूरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात त्या लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा केली जाणार आहे.

बाकीच्या जागा २८ तारखेला जाहीर करू असं अजित पवारांनी म्हटलं आहे. मात्र महायुतीतून अजित पवार गटाला किती जागा मिळाल्या याबाबत बोलण्याचं त्यांनी टाळलं. महायुतीच्या जागा वाटपाबाबत व्यवस्थित मार्ग काढला जाईल. ९९ टक्के काम पूर्ण झालं असून युतीतील मित्र पक्षांनी जागा वाटपाबाबत सहकार्य केल्याचंही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकांची राष्ट्रवादीच्या आमदार आणि मंत्र्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. आमदार विधानसभा आणि मंत्री लोकसभा निवडणुकीत काम करतील. स्टार प्रचारक म्हणून लवकरच जाहीर करू, हे सर्व महायुतीचेच प्रचारक असतील. तर निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रमुख धनंजय मुंडे असतील.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---