कृषीपंपाच्या केबल चोरांचा धुमाकूळ; चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे पोलीसांपुढे आव्हान!

सप्टेंबर 10, 2022 3:57 PM

Muktainagar News-जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । मुक्ताईनगर तालुक्यातील शेती शिवारातील कृषी पंपाच्या केबल चोरीच्या घटनात वाढ झाली असून यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे. या दोन-तीन दिवसात खामखेडा, दुई, सुकळी, टाकळी व चारठाणा शेती-शिवारातुन असंख्य शेतकरी बांधवांच्या शेतातील कृषी पंपाच्या केबलची चोरी झाली असून चोरांनी साहीत्यांची तोड-फोड सुद्धा करण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दरम्यान, चोरांच्या टोळीचा पर्दाफाश करण्याचे पोलीसांपुढे आव्हान आहे.

jalgaon 2022 09 10T155710.398

दुई शिवारातील शेतकरी सचिन तळेले, दिनकर फेगडे, मुरलीधर फेगडे, मारुती चौधरी, विष्णु चौधरी, मुकेश तळेले, मिलिंद जावळे, तुषार फेगडे यांच्यासह इतरही काही शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची केबल चोरी झाल्याची घटना दि. ६ रोजी घडली. सुकळी शिवारातील २०-२२ शेतकऱ्यांच्या शेतातील केबल चोरीच्या घटना दि. ७ रोजी घडली. दुई शिवारातील एकनाथ खडसे यांचे स्वीय साहाय्यक योगेश कोलते व इतर अनेक शेतकरी बांधवांच्या कृषी पंपाची केबल चोरीसह मोटर स्टार्टरची तोड-फोड केल्याची घटना दि. ९ रोजी मध्यरात्री घडली.

दुई शिवारातील सचिन तळेले व संदिप जावळे यांच्या शेतातील खोलीचे कुलुप तोडुन खोलीत ठेवलेल्या केबल मधील तांबे धातुची तार काढुन नेले शिवाय साहीत्यांची तोडफोडही चोरांनी केली. संदिप जावळे यांच्या शेतातील खोलीत असलेले अन्य साहीत्य व टिव्ही सुद्धा फोडुन नासधुस केली.तसेच डायरीत ठेवलेले चार हजार रुपयावरही डल्ला मारला. या प्रकारामुळे शेतकरी वर्ग धास्तावला असुन पोलीसांनी या चोरांच्या टोळीला जेरबंद करण्याची अपेक्षा शेतकरी वर्गातुन होत आहे.

दरम्यान याप्रकरणी संदिप जावळे व काही शेतकऱ्यांनी पोलीसात तक्रारी दिल्यानंतर मुक्ताईनगर पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके,पो.उ.नि.प्रदिप शेवाळे,पो.ना.ठाकुर,नायसे,होमगार्ड देवेंद्र काटे,सोपान वंजारी,सोपान बेलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.प्रसंगी पोलीस प्रशासनाकडुन याप्रकरणी तपास केला जात आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड
केबलची चोरी झाल्यास नवीन केबल खरेदी तसेच बोअरवेल मधील मोटार वर उचलण्यास लागणारे साहीत्य खर्च,दोन मजुर खर्च असा प्रत्येकी तीन हजाराचा भुर्दंड प्रत्येक शेतकऱ्याला सोसावा लागत आहे.याव्यतीरीक्त अन्य साहीत्यांची तोडफोड झाली असल्यास तो वेगळा खर्च शेतकऱ्यांना करावा लागत आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी वर्ग त्रस्त झाला असुन चोरी करणारी टोळी लवकरात लवकर जेरबंद करावी अशी माफक अपेक्षा शेतकरी बांधवांनी पोलीस निरीक्षक शंकरराव शेळके यांचेकडे बोलतांना व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories