⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

जागतिक स्क्रिझोफेनिया जनजागृती दिनानिमित्त्त गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे उपक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ मे २०२३ । जागतिक स्क्रिझोफेनिया जनजागृती दिनानिमित्त बुधवार दि. २४ मे रोजी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे डॉ. उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयातील मानसोपचार विभागात स्क्रिझोफेनियाबद्दल जनजागृती करण्यात आली.

स्क्रिझोफेनिया या आजारात व्यक्तीला भ्रम होतात, भास होतात, विचार करतांना त्यांना अडचणी येतात कालांतराने चेहऱ्यावरील हावभाव बंद होतात, सावली- अंधाराची भिती वाटते अशी विविध लक्षणे रुग्णाला जाणवतात. यावर मानसोपचार तज्ञांद्वारे उपचार केले जात असून पूर्ण उपचारानंतर व्यक्ती पुन्हा आपले आयुष्य जगु शकते, या उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेने स्क्रिझोफेनिया दिनानिमित्त सेलिब्रेटिंग द पॉवर ऑफ कम्युनिटी काइंडनेस ही संकल्पना हाती घेतली आहे.

त्या संकल्पनेला धरुन आज गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातर्फे डॉ.उल्हास पाटील धर्मार्थ रुग्णालयात उपक्रम राबविण्यात आला. यात बीएससी नर्सिंगच्या तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्क्रिझोफेनिया व हेल्थ एज्युकेशन या विषयावर पोस्टर सादर केले. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील मेंटल हेल्थ विभागातर्फे विभागप्रमुख प्रो. अश्विनी वैद्य, प्रा.नफिस खान, प्रा.सुमित निर्मल, ट्यूटर माधुरी धांडे, प्रियंका गाडेकर, अक्षय वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आल.