जळगाव लाईव्ह न्यूज । १९ फेब्रुवारी २०२२ । एरंडोल तालुक्यातील चोरटक्की गावानजिक सोन्या-चांदीचे व्यापारी राजेंद्र विसपुते यांच्या लुटप्रकरणी अटकेत असलेल्या ४ आरोपींना शुक्रवारी एरंडोल न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्या.व्ही.एस. धोंडगे यांनी आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

डिगंबर उर्फ डिग्या रविंद्र सोनवणे वय-२९ रा.भोकर ता. जि. जळगाव ,विशाल अरूण सपकाळे वय-२१ रा. कोळीपेठ, विठ्ठलमंदीराजवळ जळगाव, विशाल लालचंद हरदे वय-२६ वर्षे रा.चौगुले प्लॉट,जळगाव,संदीप राजू कोळी वय-२१वर्षे रा. कुरंगी ता. पाचोरा हल्ली मु. कुसुंबा(जळगाव) या आरोपींना गुरूवारी राञी जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेकडुन एरंडोल पोलिसांनी ताब्यात घेतले.

सरकारी वकील आर.पी.सुरळकर व आरोपींचे वकील अँड. शेखर खैरनार या दोघांचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती धोंडगे यांनी आरोपींना पोलिस कोठडी दिली.
हे देखील वाचा :
- उद्दिष्टकेंद्रीत नियोजनातून सेवा संकल्प अभियान यशस्वीपणे राबवा ; जिल्हाधिकारी रोहन घुगे
- कासोदा शिवारातील २३ शेळ्या-बोकड चोरीचा छडा; मध्यप्रदेशातून दोघे गजाआड
- जळगावात प्रेमसंबंधाच्या वादातून विवाहित महिलेचे अपहरण करून खून; आरोपी जेरबंद
- गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
- खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार! महाराष्ट्रात ८१०० पोलिसांची मेगा भरती?











