ड्युटी करुन घरी जाताना पोलीस कॉन्स्टेबल सोबत घडलं भयंकर

जून 27, 2024 5:37 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२४ । अपघाताच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नसून अशातच साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. गुलाब गोविंदा शिंपी (वय ३६)असं या मृत पोलीस कॉन्स्टेबल नाव असून याबाबत तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरु होते.

gulab shimpi jpg webp

धुळे तालुक्यातील आनंदखेडे गावात वास्तव्यास असलेले पोलीस कॉन्स्टेबल गुलाब गोविंदा शिंपी हे साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याने दररोज दुचाकीने आनंदखेडे ते साक्री अपडाऊन करायचे. काल बुधवारी दि. २६ जून रोजी रात्रीची ड्युटी असल्याने ते आज सकाळी कर्तव्य बजावून घराकडे निघाले होते.मात्र, आनंदखेडे गावाजवळच असलेल्या खाडी पुलाजवळ त्यांच्या दुचाकीने ट्रक (जीजे १२, ७४४७) ला मागाहून धडक दिली. या अपघातात पोकॉ. गुलाब शिंपी हे गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर मित्रपरिवारासह आप्तस्वकीयांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्यांना उपचारासाठी धुळ्यातील हिरे रुग्णालयात नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिसात दुपारी उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरु होते. या घटनेने पोलीस दलासह आनंदखेडे गावात हळहळ व्यक्त होत आहे. शिंपी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, ५ वर्षांची मुलगी, ३ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now