दुर्दैवी! आकाशवाणी चौकात भरधाव टँकरने चिरडल्याची दुर्घटना

ऑगस्ट 22, 2023 1:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज| २२ ऑगस्ट २०२३। मृत्यूचा सापळा म्हणून ओळख बनू पाहत असलेल्या आकाशवाणी चौकात आज भर दिवसा पुन्हा भरधाव टँकरने एकाला चिरडल्याची दुर्घटना घडली आहे.

image 55 jpg webp

आकाशवाणी चौकात महामार्गाच्या मध्यभागी चुकीच्या पध्दतीत सर्कल केल्यानंतर अनेक लहानमोठे अपघात येथे कायम होत असतात. यात अनेकांचे प्राण गेले आहेत. गेल्या महिन्यात येथे एकाचा मृत्यू झाला होता. यानंतर आज पुन्हा डंपरने चिरडल्याने एकाला प्राण गमवावे लागले आहेत.

या संदर्भात सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, जळगावहून धुळ्याकडे जाणार्‍या भरधाव वेगात असलेल्या टँकरने मोटारसारकला धडक दिली. यात मोटारसारकलस्वार हा टँकरच्या मागील चाकात आला. यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला. अचानकपणे मोठ्याने आवाज झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसही अपघातसथळी दाखल झाले. या प्रकरणी शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा मृत मोटारसायकलस्वाराची ओळख पटविण्याचे काम सुरू होते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now