---Advertisement---
गुन्हे मुक्ताईनगर

आजाराला कंटाळून तरुणाने घेतली विहिरीत उडी ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२३ । मुक्ताईनगर तालुक्यातील ३४ वर्षीय तरुणाने दुर्धर आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली. दिपक अशोक इंगळे (वय-३४) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून याबाबत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

in well death 1

पुरनाड येथे दिपक इंगळे हा आपल्या नातेवाईकसह वास्तव्याला असून तो मजूरीचे काम करून उदरनिर्वाह करीत होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याला दुर्धर आजार जडला होता. त्याला खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपासून तो घरीच होता. त्यात त्याला या दुर्धर आजारामुळे अतिशय त्रास होत होता.

---Advertisement---

त्यामुळे या आजाराला कंटाळून मंगळवारी १९ सप्टेंबर रोजी रात्री दीड ते सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान गावातील पाणीपुरवठा करण्याच्या विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक धमेंद्र ठाकूर करीत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---