⁠ 
सोमवार, डिसेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | पाचोरा | पाचोऱ्यात राष्ट्रवादीला धक्का, उपसरपंचासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला

पाचोऱ्यात राष्ट्रवादीला धक्का, उपसरपंचासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ नोव्हेंबर २०२२ । पाचोरा तालुक्यातील डांभुर्णी येथील उपसरपंच संतोष परदेशी यांच्यासह तंटामुक्ती अध्यक्ष व ७ ग्रामपंचायत सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देत आ. किशोर पाटील यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. यात सुमारे ६० जणांनी पक्ष प्रवेश केला असून आगामी निवडणुकात आ. किशोर पाटील यांना आपण भक्कम साथ देणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.

तसेच केवळ गाव विकासासाठी राजकारण हाच उद्देश आपण समोर ठेवला, आ. किशोर पाटील यांच्या माध्यमातून पाचोरा भडगाव मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलला, आम्ही देखील गाव समृद्धी साठी प्रयत्नरत असून त्यासाठीच विकासाची कास धरलेल्या आ. किशोर पाटील यांचे हाथ आम्ही बळकट करत असल्याची भावना उपसरपंच संतोष परदेशी यांनी व्यक्त केली आहे.

त्यांच्या समवेत माजी उपसरपंच शांतीलाल परदेशी पैलवान, ईश्वर परदेशी, तंटामुक्ती अध्यक्ष ज्योतिष परदेशी, भगवान परदेशी, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश तांबे, रणजीत परदेशी, विपुल परदेशी, मोहन परदेशी, गोकुळ परदेशी, रवींद्र परदेशी, सोनू परदेशी, बापूराव परदेशी, अविनाश मोची, किशोर मोची, गोपाल मोची, ज्ञानेश्वर मोची, गोकुळ मोची, गौतम जाधव, राजू धनवान, कैलास मोची, जीवन मोची, रोहित मोची, मनोज परदेशी आदींचा समावेश आहे.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.