जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२३ । यावल तालुक्यातील सातोद गाव शिवारात अर्धवट प्राण्यांनी खाल्लेले नऊ महीन्याच्या बाळाचे अर्धवट शरीर आढळून आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी बाळाच्या मृत्युस कारणीभुत अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाई सुरू आहे.

याबाबत असे की यावल तालुक्यातील सातोद येथील ग्रामपंचायतचे सफाई कर्मचारी याना आज इंदिरानगर परिसरात नऊ महिन्याचे प्राण्यांनी अर्ध शरीर खाल्लेले बाळ मिळुन आले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतावस्थेत असलेल्या अर्ध शरीराच्या बाळाला ताब्यात घेत यावलच्या ग्रामीण रुग्णालयात आणले आहे.
दरम्यान, याबाबत पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हॅड कॉन्सटेबल राजेन्द्र पवार व पोलीसांनी घटनेशी संबधीत तपासाला सुरूवात केली आहे. यावल पोलीस ठाण्यात या घटनेशी संबधित बाळाच्या मृत्युस कारणीभुत अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाई सुरू आहे .