कुटुंबिय गाढ झोपेत असतांना विवाहितेने संपविले जीवन ; दीड वर्षाचा मुलगा झाला पोरका

डिसेंबर 31, 2023 2:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२३ । मध्यरात्रीच्या सुमारास कुटुंबिय गाढ झोपेत असतांना २४ वर्षीय विवाहितेने नैराश्यातून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना जळगाव तालुक्यातील किनोद येथे घडली असून अश्विनी विशाल चौधरी (२४, रा. किनोद, ता. जळगाव) असे या विवाहितेचे नाव आहे. पती पाणी पिण्यासाठी उठल्यानंतर उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

kinod jpg webp

याबाबत असे की, जळगाव तालुक्यातील किनोद येथे अश्विनी चौधरी या विवाहिता कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या.पती विशाल हे जळगावात खाजगी क्षेत्रात काम करून उदरनिर्वाह करतात. शुक्रवार, २९ डिसेंबर रात्री सर्व जणांनी सोबत जेवण केल्यानंतर चौधरी कुटुंबीय झोपले. शनिवारी ३० डिसेंबर रोजी मध्यरात्री विवाहितेने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे ३ वाजता पती विशाल चौधरी हे पाणी पिण्यासाठी उठले. त्यावेळी ही घटना समोर आली. आत्महत्या करण्याचे कारण समोर आले नाही. त्यांनी एकच आक्रोश केला.

विवाहितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. यावेळी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now