---Advertisement---
गुन्हे रावेर

Raver Crime News : मित्राचा खून करणाऱ्या मारेकऱ्याला मध्य प्रदेशातून अटक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ नोव्हेंबर २०२३ । रावेर तालुक्यातील एनपुर येथे राहणाऱ्या अफजल शेख असलम (वय 27 वर्ष) या तरुणाचा खून निंबोल(ता.रावेर) परिरात झाला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, या तरुणाच्या मारेकऱ्यांचा मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहे. कौटुंबिक वादातून मित्राचा खून करणाऱ्या मारेकऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा व निंभोरा पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्य प्रदेशातून अटक करून तुरुंगात टाकले.

nimbola crime news jpg webp

याबाबत असे की, एनपुर येथे राहणारा मयत अफजल शेख असलम हा निंबोल शिवारातील निंबोल गावात गावरान कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावरुन जात असताना त्याच्या डोक्यावर हत्या करण्यात आली होती. ही घटना १४ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. या घटनेच्या गुन्ह्यातील आरोपीच्या शोधात स्थानिक पोलिस आणि एलसीबीचे पथक माफी पालिया पाडा तालुका नेपानगर जिल्हा बुरहानपूर भागात गेले होते. तेथून संशयित आरोपी अर्जुन नरसिंह भील 40 याला अटक करण्यात आली आहे.

---Advertisement---

अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नजन पाटील, फैजपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, निंभोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणेश धुमाळ, उपपोलीस निरीक्षक के काशिनाथ कोळंबे, आर.के.पाटील, किरण जाधव, रिझर्व्ह पिंजारी यांच्या पथकाने ही हत्या उघडकीस आणली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---