बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

देशी दारूच्या दुकानातून दारू चोरणारी टोळी पोलिसांच्या हाती

जळगाव लाईव्ह न्युज । २८ मे २०२२ । जळगाव शहरातील एका दारूच्या दुकानातून सव्वा दोन लाखांची दारु लंपास करणाऱ्या तीन आरोपींना जळगाव पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी या तिघांनी आपला गुन्हा कबुल केला आहे. याबाबतची फिर्याद नुकतीच 26 तारखेला एमआयडीसी पोलिस ठाण्यात देण्यात आली होती

भूपेश कुलकर्णी यांचे जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात दारूचे दुकान आहे. नुकतेच सव्वीस तारखेला त्यांच्या दुकानातून काही चोरट्यांनी २,१५,५१० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत मुकेश कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता

या गुन्ह्याचा शोध गुन्हे शोध पथकातील इम्रान सय्यद यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून घेण्यात आला. यावेळी रशीद सय्यद वय २०, उमेश पाटील उर्फ भावड्या संतोष, वय १९ , शेवी खान चांद खान वय १९ (सर्व राहणारे जळगाव शहरातले) यांना ताब्यात घेण्यात आलं. हे सर्वजण गेल्या काही दिवसांपासून महागड्या वस्तू विकत घेत असल्याचा संशय आल्याने यांना ताब्यात घेण्यात आले. व त्यांनी गुन्हा कबूल केला.

ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अतुल वंजारी, इमरान अली सय्यद, समीर सावळे, सचिन पाटील, नीलोफर सय्यद यांनी ही कारवाई केली. पुढचा तपास रामकृष्ण पाटील करत आहेत