रणवीर सिंगच्या अडचणीत वाढ ; अखेर ‘त्या’ प्रकरणी गुन्हा दाखल

जुलै 26, 2022 2:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२२ । बॉलिवूड(Bollywood) अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या त्याच्या न्यूड फोटोंशूटमुळे (Nude Photoshoot) चर्चेत आला आहे. या फोटोशूटमुळे अनेकांनी त्याच्यावर टीकेचे झोड उठवली आहे. अशातच रणवीर सिंग याला न्यूड फोटोशूट चांगलंच महागात पडलं आहे. कारण त्याच्याविरुद्ध मुंबईतील चेंबूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेंबूरचे रहिवासी ललित टेकचंदानी यांनी हा एफआयआर दाखल केला आहे.

ranveer sing jpg webp

रणवीरवर महिलांच्या भावना दुखावल्याचा आणि प्रतिष्ठेला हानी पोहोचवल्याचा आरोप आहे. भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 292, 293, 509 आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या कलम 67 (A) अंतर्गत रणवीरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रणवीरवर ज्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्या अंतर्गत त्याला 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. त्याच्याविरुद्ध आयटी कायद्याच्या कलम ६७(ए) अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, जो अजामीनपात्र आहे.

बॉलिवूडचा बाजीराव समजला जाणारा रणवीर सिंग याने न्यूड फोटोशूट करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. सध्या सर्वत्र रणवीरच्या न्यूड फोटोशूटचीच चर्चा आहे. रणवीरचा न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. रणवीरच्या फोटोशूटचे काहींनी कौतुक केलं आहे. मात्र, काहींनी त्याच्यावर कडाडून टीका देखील केली आहे. रणवीर सिंगने केलेल्या न्यूड फोटोशूटनंतर तो सातत्यानं वादात सापडताना दिसत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतरही यामागे काहीतरी राजकारण सुरू झाल्याच्या चर्चा देखील सुरू झाल्या आहेत. काही राजकारण्यांनीही रणवीरच्या फोटोंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now