Sunday, August 14, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

स्वातंत्र्यदिनी मुक्ताईनगरात फडकणार ७५ फूट उंचीचा तिरंगा!

सायसिंग पाडवीbyसायसिंग पाडवी
August 6, 2022 | 11:04 am
jalgoan 9

पाच वर्षांपासून नियमित राष्ट्रगीत गायिले जाणारे गावं महाराष्ट्रातुन पहीले व देशातुन दुसरे!

जळगाव लाईव्ह न्यूज । सुभाष धाडे । देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. हा अमृत महोत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी मुक्ताईनगरात सुमारे ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यासाठी आ. चंद्रकांत पाटील हे प्रयत्नशील असून जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत व मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. आमदार पाटील यांनी जोरदार पाठपुरावा सुरु केला असून येत्या १५ ऑगस्टला मुक्ताईनगर शहरात ७५ फुट उंचीचा तिरंगा फडकणार आहे. दरम्यान, येथील काही बांधवांच्या संकल्पनेतुन सुमारे पाच वर्षापासुन (२६ जानेवारी २०१७) शहरातील प्रवर्तन चौकात दररोज नित्यनियमाने सकाळी आठ वाजता राष्ट्रगान गायिले जात असल्याचा कौतुकास्पद उपक्रम मोठ्या उत्साहाने राबविला जात आहे. विशेष म्हणजे भारतातील दुसरे व महाराष्ट्रातील पहिले गाव आहे. दररोज राष्ट्रगीत मुख्य चौकात न चुकता गायनाच्या उपक्रमास बॉलिवूड बादशाह या सदीचे महानायक अभिताप बच्चन यांनी आपल्या लीगल ट्विटर अकाऊंट वर ट्विट करून प्रणाम हा शब्द लिहला. सदरील कार्यक्रमाला खासदार, आमदार आणि मध्यप्रदेश च्या तत्कालीन नेपा नगर च्या आमदार यांनी सुद्धा भेट देऊन पाहणी केली आहे.

भारत स्वातंत्र्याला ७५वर्ष पूर्ण होत आहे. या गौरवशाली पर्वानिमित भारत स्वातंत्र्याचा ‘अमृत महोत्सवी वर्ष’ संपूर्ण देश साजरा करीत आहे. तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविले जात आहे. मुक्ताईनगर शहरातील सौंदर्यात भर म्हणून तसेच जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतविलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे. देश भक्तीची ज्वाजल्य भावना कायम स्वरूपी जनमानसात रुजावी, दैदिप्यमान इतिहासाचे अभिमान पूर्वक संस्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत मुक्ताईनगर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रवर्तन चौकात सुमारे ७५ फुट उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारणी करीता परवानगी मिळावी. यासाठी आमदार चंद्रकांत पाटील प्रयत्नशील असुन, लागणारा निधी त्यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून खर्च करण्याची त्यांची तयारी आहे. यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित राऊत यांच्याकडे पत्रव्यवहार केला असून राष्ट्रस्तंभ लवकरात लवकर उभारणी व्हावी, यासाठी सदरील कामास मंजुरी साठी तांत्रिक रीत्या आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे पत्र देवून मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी अश्विनी गायकवाड यांचेकडे देखील पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे आमदार पाटील यांनी यासाठी जोरदार पाठपुरावा सुरु केल्याचे दिसून येत आहे. येत्या १५ ऑगस्ट २०२२ रोजी मुक्ताईनगर शहरात ७५ फुट तिरंगा फडकणार आहे.

विशेष म्हणजे येथील सामाजिक कार्यकर्ते बबलू सापधरे, धनंजय सापधरे, अश्विन कोळी, बंटी देशमुख, गजानन मालगे, संतोष सापधरे, विवेक पोहेकर, रवींद्र भालेराव, अक्षत माळी, प्रफुल्ल जैन, अश्विन कोळी, अमरदीप पाटील, दीपक धायडे, पुरुषोत्तम पोलाखरे, शुभम तळेले यांच्या संकल्पनेतुन सुमारे पाच वर्षापासुन (26 जानेवारी 2017) शहरातील प्रवर्तन चौकात दररोज नित्यनियमाने सकाळी आठ वाजता राष्ट्रगान गायिले जात असल्याचा कौतुकास्पद उपक्रम मोठ्या उत्साहाने राबविला जात आहे.

Follow Us

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

in मुक्ताईनगर, विशेष
Tags: A 75 feet high tricolor will be hoistedIndependence DayMuktainagar
SendShareTweet
सायसिंग पाडवी

सायसिंग पाडवी

sushilnagar-munot-advt
Copy
Next Post
jalgaon

जळगावच्या लेखकांचे क्रीडा विषयक पुस्तकाचे हरियाणा राष्ट्रीय स्पर्धेत प्रकाशन!

LIC HFL Recruitment 2022

LIC मध्ये 'या' पदांसाठी बंपर भरती.. 80,000 रुपये पगार मिळेल, त्वरित करा अर्ज?

jalgaon Live Thambnail 5

अमृत महोत्सव लेखनमाला : देशासाठी बलिदान देणारा विलक्षण प्रसंग, फासावर लटकणारे वीरमातेचे तीन सुपुत्र

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group