⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

ऐकावं ते नवलच ! 25 वर्षाच्या मुलीने केलं 70 वर्षाच्या माणसाशी लग्न

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । प्रेम हे आंधळं असते. प्रेमाला वय मर्यादा नसते. असाच एक प्रकार समोर आला. 25 वर्षाच्या मुलीने 70 वर्षाच्या माणसाशी लग्न केलं आहे. या दोघांच्या वयात ४५ वर्षांचा फरक आहे. परंतु या जोडप्याचे म्हणणे आहे की ते त्यांच्या नात्यात वयाचा फरक हावी होऊ देत नाहीत. त्यांना जगाकडून मिळणाऱ्या टोमण्यांचीही पर्वा नाही. कॅनडास्थित पती-पत्नीने एका शोमध्ये त्यांच्या नात्याबद्दल सांगितले आहे.

पत्नी स्टेफनीने ‘लव्ह डोंट जज’ शोमध्ये सांगितले की, तिचे कुटुंबीय या नात्यावर खूश नाहीत. स्टेफनीच्या पतीचे नाव डॉन आहे. या दाम्पत्याला दोन वर्षांचा मुलगाही आहे.स्टेफनीने सांगितले की, ती डॉनला 5 वर्षांपूर्वी एका पबमध्ये भेटली होती. स्टेफनी या पबमध्ये काम करत होती. स्टेफनीच्या म्हणण्यानुसार, डॉन जेव्हाही पबमध्ये यायचा तेव्हा तो खूप आनंदी असायचा. इथून दोघांमध्ये रोमान्स सुरू झाला.

image 10

पण, 45 वर्षांच्या वयातील फरकाची माहिती मिळताच अनेकांना या नात्याबद्दल आश्चर्य वाटले. सर्वात आश्चर्यकारक ते लोक होते जे स्टेफनीच्या जवळ होते आणि ज्यांचे वय सुमारे 20 वर्षे होते. स्टेफनीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तिचे वडील, भाऊ आणि आई यांना या नात्याबद्दल कळले तेव्हा त्यांना धक्काच बसला. स्टेफनीचे हे नाते फार कमी काळ टिकेल अशी भीती त्यांना वाटत होती.

image 9

पती-पत्नी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत
पती-पत्नी लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाहीत. डॉन म्हणाला की काही वेळा लोकांना वाटते की तो लचलानचा आजोबा आहे. पण ते याचा फारसा विचार करत नाहीत, लोकांना सुधारण्याचा प्रयत्नही करत नाहीत. स्टेफनीने सांगितले की अनेकांना वाटते की ती डॉनसोबत आहे कारण त्याला त्याच्या जीवन विम्याचे पैसे मिळतील.