२२ वर्षीय तरुणीची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

एप्रिल 6, 2022 3:38 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ एप्रिल २०२२ । भडगाव तालुक्यातील वडगाव येथील २२ वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सविता किरण राठोड (वय २२) असे गळफास घेतलेल्या तरूणीचे नाव आहे. या प्रकरणी भडगाव पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

crime

अधिक अशी की, सोनी राठोड ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ५ एप्रिल रोजी घरी कुणीही नसतांना सोनी राठोड हिने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दुपारी उघडकीला आली आहे. सायंकाळी तिचे कुटुंबीय घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. शेजारचांच्या मदतीने तिला भडगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे कारण नेमके कळू शकले नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now