जळगाव लाईव्ह न्यूज । २ मे २०२४ । हिंद महासागरात साधारणपणे मान्सूनपूर्व आणि पावसाळ्यात वादळे येतात. ही वादळे अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरावर निर्माण होतात. या वर्षी, मान्सूनपूर्व काळात म्हणजे एप्रिल ते जून दरम्यान (भारतात मान्सून मजबूत होईपर्यंत) कोणतेही वादळ येण्याची शक्यता नाही. मात्र, यंदा पावसाळ्यात जोरदार वादळे येणार आहेत.
यामुळे यंदाच्या मॉन्सूनमध्ये मुंबईकरांसाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईच्या समुद्रात यंदा 4.84 मीटरपेक्षा जास्त हायटाईड (भरती) 22 वेळा येण्याची शक्यता आहे. ही भरती जून ते सप्टेंबर 2024 दरम्यान येण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईतील सखलभागात पाणी साचणार आहे. पावसासोबत हायटाईड आल्यानंतर हा धोका निर्माण होतो.
जूनमध्ये सात दिवस 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती असेल. जुलैमध्ये असे चार दिवस, ऑगस्टमध्ये पाच दिवस आणि सप्टेंबरमध्ये सहा दिवस अशी भरती असणार आहे. 20 सप्टेंबर रोजी सकाळी 1:03 वाजता उंच भरती 4.84 मीटरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
जूनमध्ये असे येणार हाईटाइड
5 जून- 11: 17 वाजता – 4.61 मीटर 6 जून -12 : 05 वाजता – 4. 69 मीटर 7 जून – 12 : 50 वाजता – 4 . 67 मीटर 8 जून – 01 : 34 वाजता – 4. 58 मीटर 23 जून – 01: 09 वाजता – 4. 51 मीटर 24 जून- 01: 53 वाजता- 4. 54 मीटर
जुलैमध्ये असे येणार हाईटाइड
22 जुलै – दुपारी 12:50 वाजता – 4.59 मीटर 23 जुलै- दुपारपी 1:29 वाजता – 4.69 मीटर 24 जुलै – दुपारी 02:11वाजता – 4.72 मी 25 जुलै – दुपारी 02:51 वाजता- 4.64 मीटर
ऑगस्टमध्ये असे येणार हाईटाइड
19 ऑगस्ट – सकाळी 11:45 वाजता – 4.51 मीटर 20 ऑगस्ट – दुपारी 12:22वाजता – 4.70 मी 21 ऑगस्ट- दुपारी 12:57 वाजता- 4.81 मीटर 22 ऑगस्ट- दुपारी 1:35 वाजता 4.80 मीटर 23 ऑगस्ट- दुपारी 2:15 वाजता 4.65 मीटर
सप्टेंबरमध्ये असे येणार हाईटाइड
17 सप्टेंबर – सकाळी 11:14 वाजता – 4.54 मीटर 18 सप्टेंबर – सकाळी 11:50 वाजता – 4.72 मीटर 19 सप्टेंबर – दुपारी 12:19 वाजता 4.69 मीटर 20 सप्टेंबर – दुपारी 1:03 वाजता 4.84 मीटर 21 सप्टेंबर – दुपारी 1:42 वाजता 4.50 मीटर 22 सप्टेंबर – दुपारी 2.33 वाजता 4.64 मीटर