ऐन लग्नसराईमध्ये सोन्याच्या किमतीने ग्राहकांना फोडला घाम, आठवडाभरात 70 हजाराचा पल्ला गाठणार?

मार्च 12, 2024 10:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मार्च २०२४ । आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम झाल्याने देशांतर्गत सराफ बाजारात सोन्याच्या किमतीने डोंगर गाठला आहे. जळगावात गेल्या आठवड्याभरात सोन्याच्या प्रति तोळ्याच्या दरात २६०० रुपयांची वाढ होऊन दर उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. सोन्याचा दर ७० हजार रुपयाचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे चांदीचा दरही वाढला आहे. ऐन लग्नसराईमध्ये सोने चांदीचे दर महागल्याने ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.

gold silver jpg webp

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दर ६६ हजार रुपये तोळा उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. मागच्या ११ दिवसांत सोनं तब्बल ३ हजाराहून अधिक रुपयांनी महागले आहे. जळगावात १ मार्चला सोन्याची किंमत प्रतितोळ्यासाठी ६२,६०० रुपये इतकी होती. तर ७ मार्च रोजी सोन्याने ६५ हजारांचा टप्पा ओलांडला होता.

काय आहे नवा दर?
सोन्यात गेल्या आठवड्याभरात २६०० रुपयांची वाढ झाली होती. सध्या २४ कॅरेट सोन्याचा प्रतितोळ्याचा भाव विनाजीएसटी ६६,००० हजार रुपयावर विकला जात आहे. दुसरीकडे चांदी ७४००० रुपये प्रति किलो इतका आहे. दरम्यान, किमतींनी मोठा डोंगर गाठल्यामुळे सोने खरेदी करण्यापासून ग्राहक लांब राहत आहे.

त्यासोबतच मार्च महिन्यात लग्नसराईच्या तारखा नररल्याने उलाढालीवर ३५ ते ४० टक्के परिणाम झालेला असल्याचे सराफा व्यावसायिक यांनी सांगितले. दरम्यान, सोन्याचे दर सध्या चढते असून हा आलेख आठवडाभरात ७० हजार रुपयांचा टप्पा गाठण्याचाही अंदाज आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now