⁠ 
शुक्रवार, मे 10, 2024

शिंदे गटाला मोठा धक्का; आमदार अपात्रतेचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात, आजच्या सुनावणीत काय घडलं?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मार्च २०२४ । विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला होता. आज ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडत आहे.

यावेळी सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटाच्या वकिलांना सवाल केला. राज्यातील सत्तासंघर्षावर आमच्या निकालपत्रात जे निर्देश दिले होते त्याच्या विरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी निर्णय दिलाय का? असा सवाल केला. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांसमोर झालेल्या सुनावणीतील मूळ कागदपत्रं सर्वोच्च न्यायालयाने मागवली आहेत. खरा पक्ष कोणता आहे हे विधानसभेतील बहुमतावरून ओळखता येते, हे निकालाच्या विरोधात नाही का? असा प्रश्नही कोर्टाने विचारला. या प्रकरणावर आता सर्वोच्च न्यायालयाने 8 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

आजच्या सुनावणीत कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली. यावेळी बोलताना त्यांनी “नोव्हेंबरमध्ये कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे यावर लवकर सुनावणी झाली पाहिजे, नाहीतर प्रकरण निरस्त ठरेल. अशी विनंती कोर्टाला केली. तसेच अध्यक्षांनी तुमच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ लावला आहे,” असेही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

तर शिंदे गटाकडून हरिष साळवे यांनी बाजू मांडली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्ष यांच्यकडे दाखल केलेली कागदपत्रे आणि कोर्टात दाखल केलेली कागदपत्र यात तफावत आहे. हा फक्त एक मुद्दा आहे असे अनेक मुद्दे आहेत, असा दावा केला. यावर सरन्यायाधिशांनी आमच्या निकालपत्रात जे लिहिलेलं त्याविरोधात निर्णय नाही झालाय का? असा थेट सवाल साळवेंना विचारला.