सोने 100 रुपयाने तर चांदी 500 रुपयांनी वधारली ; जळगावातील भाव तपासून घ्या..

फेब्रुवारी 20, 2024 1:42 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० फेब्रुवारी २०२४ । सध्या सोने आणि चांदीच्या किंमतीत चढउताराचे सत्र आहे. डिसेंबर महिन्यात दोन्ही धातूंनी सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यांनतर जानेवारीत ग्राहकाना दिलासा मिळाला. पण डिसेंबर 2023 सारखी उच्चांकी कामगिरी दोन्ही धातूंनी बजावली नाही. गेल्या दोन तीन आठवड्यात सोने चांदीत घसरण दिसून आली. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्यासह चांदी दरात वाढ दिसून आली. Gold Silver Rate 20 February 2024

gold 1 jpg webp

जळगावात सोन्याच्या दरात 100 रुपयाची वाढ दिसून आली तर दुसरीकडे चांदी दरात 500 रुपयाची वाढ झाली. यामुळे सध्या जळगावच्या सराफ बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर 57,200 रुपयांवर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 62,500 रुपये इतका आहे. तसेच चांदीचा एक किलोचा दर विनाजीएसटी 72,500 रुपयांवर आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा दर?
सध्या, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर दुपारी 1 वाजेपर्यंत सोन्याची किंमत 0.08 टक्क्यांनी म्हणजेच 48 रुपयांच्या वाढीसह 62,052 रुपयांवर ट्रेंड करत आहे. तर चांदीची किंमत 0.16 टक्क्यांनी म्हणजेच 113 रुपयांनी घसरून 71,193 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now