आता हे काय! जळगावात अल्पवयीन मुलीला मुलीनेच फूस लावून पळविले.. गुन्हा दाखल

फेब्रुवारी 5, 2024 9:32 AM

जळगाव लाईव्ह न्यूज : 5 फेब्रुवारी 2024 : मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून फूस लावून पळवून नेल्याच्या घटना अलीकडे वाढल्या आहेत. मात्र जळगाव शहरातील रामानंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला त्याच परिसरातील एका मुलीने फूस लावून पळवून नेले.

crime 2 jpg webp

ही घटना ३१ जानेवारी रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी पळवून नेणाऱ्या तरुणीविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१४ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणीने सोबत घेत किराणा दुकानावर जाऊन येतो, असे सांगून सोबत नेले; परंतु ती घरी न परतल्याने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र, ती न सापडल्याने रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पळवून नेणाऱ्या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि गोपाल देशमुख करत आहेत

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now