बजेटपूर्वी सोने-चांदी दरात वाढ ; जळगावातील आजचा भाव तपासून घ्या..

जानेवारी 30, 2024 11:03 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | 30 जानेवारी 2024 | महिन्याच्या अखेरीस सोने-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दोन्ही धातूंच्या भावात वाढ झाली. सोने प्रति तोळा १०० रुपयांनी तर चांदी ५०० रुपयांनी महागली आहे. यामुळे जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचा भाव पुन्हा ६३ हजार (विनाजीएसटी) रुपयावर गेला आहे. Gold Silver Rate 30 January 2024

gold jpg webp

यापूर्वी जळगाव सुवर्णनगरीत गेल्या आठवड्यात सोने दरात प्रति तोळा २०० रुपयांची तर चांदीच्या दरात ५०० रुपयाची वाढ झाली. बजेट अगदी तोंडावर येऊन ठेपले आहे. बजेटनंतर सोने-चांदीचे दर कुठवर जातात याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे. तरीही डिसेंबर महिन्यापेक्षा या महिन्यात सोने-चांदीत स्वस्ताई आहे.

नवीन वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात सोन्यासह चांदीच्या दरातील चढ-उतार सामान्य राहिली आहे. या महिन्यात सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला असून १ जानेवारी पासून आतापर्यंत सोने ७०० ते ८०० रुपयांनी तर चांदी १५०० रुपयांनी स्वस्त आहे.

जळगावातील सोने-चांदीचा दर:
सध्या जळगावात २२ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ५७,७०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. त्याचप्रमाणे २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ६३००० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर चांदीचा दर विनाजीएसटी ७३,००० रुपये प्रति किलो इतका आहे.
वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now