कापसाच्या वजनामध्ये हेराफेरी पडली महागात ; व्यापाऱ्यास चोप देत शेतकऱ्यांनी घेतली भरपाई

जानेवारी 25, 2024 4:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ जानेवारी २०२४ । आधीच कापसाला भाव नसल्याने शेतकरी संकटात आहे. त्यातच काही ठिकाणी व्यापाऱ्यांकडून मापातपाप करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यातील सुयासगाव मधून समोर आला. येथे व्यापाऱ्याला कापसाच्या वजनामध्ये हेराफेरी करणं चांगलच महागात पडल आहे. हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने व्यापाऱ्याला चांगलाच चोप दिला आहे.

cotton jpg webp

सुयासगाव या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून कापूस व्यापाऱ्याने जवळपास चार ट्रक भरून कापूस खरेदी केला होता. परंतु सदर व्यापारी हा मापात पाप करत असल्याचा प्रकार शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. या नंतर सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येत या व्यापाऱ्यास व त्याच्या सहकाऱ्यांना चांगलाच चोप दिला.

सदर व्यापारी हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्यास चांगलाच चोप दिला आहे, या व्यापाऱ्याने महिनाभरात गावातून घेतलेल्या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई पोटी ५ लाख १० हजार रुपये परत केल्यानंतर या व्यापाऱ्याची सुटका गावातील शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर गावात या व्यापाऱ्यास कायमस्वरूपीची बंदी करण्यात आली आहे. यामुळे या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना मापात पाप करणं चांगलंच महागात पडल आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now