जळगाव पोलिसांच्या वाहनाला पालघर घाटात अपघात, चौघे जखमी, इतर सुखरूप

जानेवारी 18, 2024 11:14 AM

जळगाव लाईव्ह न्यूज | १८ जानेवारी २०२४ | जळगाव जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी मुंबई येथे पालघर बंदोबस्तासाठी जात असताना मोखाडा घाटात पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. अपघातात ४ पोलीस कर्मचारी जखमी झाले असून इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. दोघांना नाशिक येथे हलविण्यात येत आहे.

police van accident

जळगाव जिल्हा पोलीस दलातील १३ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मुंबई येथे बंदोबस्त कामी जात होते. पोलीस वाहन क्रमांक एमएच.१९.सीयु.५०९३ ने जात असताना मोखाडा घाटात वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. अपघातात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले असून दोघांना नाशिक येथे हलविण्यात येत आहे.

पोलीस वाहनात उल्हास राणे, शेखर पाटील, अमोल देशमुख, प्रमोद कंडारे, महेंद्र भटीत, संदीप ठाकरे, बाळू पाटील, करुणासागर जाधव, हेमंत साळुंखे, जितेंद्र पांडव, संतोष बोरसे, अनिल पाटील, रवी जाधव हे कर्मचारी होते. कुणालाही गंभीर दुखापत झालेली नसून सर्व कर्मचारी सुखरूप आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now