भुसावळात व्यापाऱ्याचे बंद घर फोडून लाखोंचा ऐवज लांबविला

जानेवारी 9, 2024 3:40 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जानेवारी २०२४ । घरफोडीचे सत्र सुरूच असून भुसावळ शहरात व्यापाऱ्याचे बंद घर फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार समोर आला हे. याबाबत भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bhusawal gharfodi jpg webp

याबाबत असे की, भुसावळ शहरातील पटेल कॉलनीत परिवारासह वास्तव्यास असलेले इम्तीयाज मोहम्मद युनूस बागवान (वय ४०) व्यापारीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. रविवारी ७ जानेवारी रोजी सकाळी ८ ते घर बंद करून कामानिमित्त बाहेर गेले होते.

दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत घरातून ५ लाख ४५ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दानिगे चोरून नेले. इम्तीयाज बागवान हे रात्री ८.३० वाजता घरी आले तेव्हा घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी भुसावळ बाजारपेठ पोलीसांना घटनेची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. याप्रकरणी सोमवारी ८ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर भोये हे करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now