Gold Silver Rate : या आठवड्यात सोने-चांदी दरात मोठी घसरली ; पहा आजचे भाव

जानेवारी 7, 2024 10:51 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । 7 जानेवारी 2024 । सोने चांदीचे दर वरखाली होत असल्याचे दिसून येत आहे. मागील काही दिवसापासून घसरण होत असलेल्या सोन्याच्या दरात किंचित वाढ दिसून आली. तर दुसरीकडे चांदीचा दर स्थिर आहे. आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यात जळगावच्या सुवर्णनगरीत सोने 600 ते 700 रुपयांनी तर चांदी 1500 हजारांपेक्षा अधिकने घसरली. यादरात घसरण झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

gold jpg webp

सोन्याच्या दरात 100 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे आता जळगावच्या सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा दर 57,890 रुपये 10 ग्रॅमने विकला जात आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 63,200 रुपये आहे. यापूर्वी शनिवारी सकाळच्या सत्रात सोन्याचा दर 63,100 रुपये इतका होता.

दरम्यान, सोने दराने वर्षाच्या सुरुवातीला मोठी उसळी घेतली. त्यानंतर किंमतीत घसरण दिसून आली. दिवाळीपासून सोन्यासह चांदीने घौडदौड सुरुच ठेवली आहे. दरवाढीने ग्राहकांच्या आनंदावर विरजण पडले होते. मात्र या आठवड्यात घसरण दिसून आली. सोने 4 डिसेंबर 2023 रोजी 64,000 रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावरून 800 रुपयांनी स्वस्त झाले आहे.

दुसरीकडे चांदीचा भाव विनाजीएसटी 73,000 रुपये प्रति किलो झाला आहे. या आठवड्यात चांदीच्या दरात 1500 हजारांपेक्षा अधिकने घसरण झाली आहे. तर चांदी 4 डिसेंबर 2023 रोजी 77,800 रुपयांच्या सार्वकालिक उच्चांकावरून 4800 ते 4900 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now