ग्राहकांना दिलासा! सोने चांदीच्या भाववाढीला अखेर ब्रेक, आजचा दर तपासून घ्या..

जानेवारी 4, 2024 9:12 AM

जळगाव लाईव्ह न्यूज : 4 जानेवारी 2023 : सोने-चांदीच्या किंमतींनी वर्षाच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता आणली आहे. या नवीन वर्षाचे स्वागत दरवाढीने झाले होते. गेल्या दोन दिवसात दरवाढ झाली पण या भाववाढीला अखेर ब्रेक लागला. दोन्ही धातूचे दर घसरले आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. Gold silver rate 4 January 2024

gold silver rate jpg webp

काय आहे आजचा सोन्यासह चांदीचा दर :
गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 56,650 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,970 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तसेच एक किलो चांदीचा भाव 78,600 रुपये आहे.

कोरोनानंतर सोने चांदीचे दर चांगलेच वधारले आहे. गेल्या वर्षभराची तुलना करता सोन्याचा भाव तब्बल 6600 रुपयांनी वाढला आहे. तर दुसरीकडे चांदीचा एक किलोचा दर 6000 रुपयांनी वधारला आहे. ऐन लग्न सराईत दोन्ही धातुंचे दर महागाल्याने ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.

गेल्या महिन्यात, डिसेंबर 2023 मध्ये सोने-चांदीच्या किंमतींनी नवीन उच्चांक गाठला होता. हा रेकॉर्ड या वर्षाच्या सुरुवातीला तुटण्याची शंका होती. पण नवीन वर्षातील सुरुवातीच्या दोन दिवसांत मौल्यवान धातूंनी जोरदार चढाई केली. पण या घौडदौडीला ब्रेक लागला आहे. किंमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now