सोने-चांदी पुन्हा रेकॉर्ड तोडणार? आजचे भाव त्वरित तपासून घ्या..

डिसेंबर 21, 2023 10:35 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ डिसेंबर २०२३ । सोन्यासह चांदीचे भाव कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आंतरराष्ट्रीय बाजारातून मिळालेल्या मजबूत संकेतांमुळे सध्या किमतीत वाढ होताना दिसत आहे. दहा दिवसांपूर्वी सोने-चांदीने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळवले होते. सोन्याने विनाजीएसटी 64,000 हजारांचा टप्पा ओलांडला होता. तर चांदीने 80 हजारांकडे घौडदौड सुरु केली होती. पण या वेगाला ब्रेक लागला. Gold Silver Rate 21 December 2023

gold silver 1 jpg webp

गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला मौल्यवान धातूत घसरण झाली. पण शेवटच्या दिवसात आणि या आठवड्यात दोन्ही धातूंचा जोर कायम आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,900 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,150 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आठवड्याच्या सुरुवातीला 19 डिसेंबर रोजी सोन्याचा भाव 100 रुपयांनी वधारला. 20 डिसेंबर सोन्याने रोजी 380 रुपयांची झेप घेतली

चांदीच्या किमतीबद्दल बोलायचं झाल्यास या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत 300 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात चांदीने 3500 रुपयांची उसळी घेतली होती. 18 डिसेंबर रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. 19 डिसेंबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. तर 20 डिसेंबर रोजी चांदीने 1 हजार रुपयांची उसळी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,500 रुपये आहे.

MCX वरील दर
जर आपण मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याबद्दल बोललो, तर आज गुरुवारी सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याची किंमत 0.10 टक्क्यांनी म्हणजेच 63 रुपयांच्या वाढीसह 62,478 वर ट्रेंड करत आहे. तर MCX वर चांदीची किंमत 0.03 टक्क्यांनी म्हणजेच किरकोळ 23 रुपयांनी घसरून 75,460 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

जळगाव सुवर्णनगरीमधील दर
दरम्यान, जळगावात सोन्याचा दर विनाजीएसटी 62,900 रुपयांवर गेला आहे. तर एक किलो चांदीचा दर 75,000 रुपयावर पोहोचला आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now