या आठवड्यात सोन्याच्या किमतीत दिलासा, मात्र चांदीत मोठी वाढ

डिसेंबर 17, 2023 10:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ डिसेंबर २०२३ । सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार दिसून येत असून डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याच्या दरात किंचित बदल दिसून आला. मात्र चांदीच्या दरात मोठी वाढ झालेली दिसतेय. Gold Silver Rate 17 December 2023

gold silver 2 jpg webp

या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीने ग्राहकांना बळ दिले. भाव उतरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता.मात्र, 14 डिसेंबर रोजी गुरुवारी भावात जोरदार वाढ पाहायला मिळाली. शुक्रवारी पुन्हा दरवाढ झाली. शनिवारी मात्र मौल्यवान धातूने ग्राहकांना दिलासा दिला. जळगाव सराफ बाजारात या आठवड्याभरात सोन्याच्या दरात किंचित १०० ते १५० रुपयाची वाढ दिसून येतेय. मात्र चांदीच्या दरात तब्बल २८०० ते ३००० रुपयाची वाढ दिसून येतेय.

गेल्या रविवारी (१० डिसेंबर) सकाळच्या सत्रात २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळ्याचा दर विनाजीएसटी ६२,३०० रुपयापर्यंत विकला जात होता. मात्र आता हा दर ६२,४०० रुपयापर्यंत आला आहे. दुसरीकडे चांदीचा दर गेल्या रविवारी विनाजीएसटी ७२००० रुपये प्रति किलो इतका होता. तो आता ७५००० रुपयांवर आला आहे.

दिवाळीपासून सोने-चांदीने धडाधड रेकॉर्ड नावावर नोंदवले. ४ डिसेंबर रोजी सराफ बाजारात सोन्याचा प्रति तोळ्याचा दर विनाजीएसटी ६४,३०० रुपयांवर गेला होत. तर चांदीचा दर विनाजीएसटी ७८ रुपयांवर गेला होता. गेल्या आठवड्यात दिलासा मिळाला होता. मात्र या आठवड्यात सोन्याच्या किमतीत किंचित दिलासा मिळाला असून चांदीने मात्र उसळी घेतली. दरम्यानं ऐन लग्नसराईत सोने खरेदी करण्याच्या उत्साहावर विरजण पडले होते. सोन्यात अजून घसरण होण्याची ग्राहक प्रतिक्षा करत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now